सोलापूर // प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी अखेर भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पालकमंत्री दत्तात्रय भरणे,उमेदवार भगिरथ भालके यांचे उपस्थितीमध्ये गुरुवार दि.08 एप्रिल रोजी सकाळी 09 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुक जाहीर झालेनंतर राजकीय वर्तुळामध्ये कल्याणराव काळे यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन वर्षापुर्वी त्यांनी आपल्या कारखानदारीच्या अडचणी सोडविण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. विट्ठल परिवारातील घटक असलेल्या श्री विट्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.भारत भालके यांच्या निधनानंतर भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा असा कार्यकर्त्यांनमधून रेटा वाढत होता तर दुसरीकडे भाजपा मधील वरिष्ठ नेते त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून मनधरणी करीत होते. मागील आठवडाभरातील चर्चेनंतर काळे यांनी अजितदादा पवार यांचेशी चर्चा करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर येथील कोर्टी रोडवरील श्रीयश पॕलेस येथे पक्ष प्रवेश होणार असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.