भाजपच्या राजहट्टासाठी पंढरपूर मंगळवेढा जनतेवर कोरोनाचे संकट÷शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे




पंढरपूर // प्रतिनिधी

भाजपाच्या राजहट्टासाठी निवडणूक लागली आणि पंढरपूर मंगळवेढा येथील जनतेवर वाढत्या कोरोनाचे अतिरिक्त संकट आले.कोरोनाच्या वाढलेल्या प्रदुर्भावास भाजप जबाबदार असून भाजपला याची किंमत मोजावीच लागेल असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक संदिपराजे मुटकुळे यांनी म्हटले आहे. 

दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या वल्गना केल्या आणि प्रत्यक्षात मात्र कोरोनाच्या काळात जनतेवर निवडणूक लादली. कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना आणि लोकांना घरात बसण्याचे आवाहन केले जात असताना निवडणुकीच्या निमित्ताने सगळीकडे गर्दी पाहायला मिळत होती.राजकीय पक्षाच्या बैठका,प्रचार आणि प्रचारसभा यांना मोठी गर्दी होत होती आणि कोरोनाचे सगळे नियम पायाखाली तुडवले जात होते.याचा परिणाम म्हणून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि सर्वसामान्य जनतेचे जगणे संकटात आले.या पापाला केवळ भाजपचा राजहट्टच जबाबदार असल्याचा आरोप मुटकुळे यांनी केला आहे.कार्यरत आमदारांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आणि संस्कृती असताना भाजपचा राजहट्ट आड आला आणि निवडणूक लादली गेली.स्वतः हे पातक करून आपल्या चमच्यांच्या माध्यमातून भगीरथ भालके यांच्या बालहट्टामुळे निवडणूक लागल्याचा अपप्रचार करण्यात आला भारतनानांच्या पत्नी जयश्रीताई भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती असे अकलेचे तारेही या चमचे मंडळीनी तोडले.सर्वात आधी भाजपने उमेदवारी जाहीर केली होती एवढी सामान्य माहितीही यांना नाही काय?असा सवालही संदिपराजे मुटकुळे यांनी उपस्थित केला आहे.  भाजपच्या हट्टासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पोट निवडणुकीचा घाट घातला गेला, आणि सगळ्याच उमेदवारांनी प्रचार सभा घेतल्या.महाविकास आघाडी, भाजप या पक्षांच्या तर मोठया सभा होत गेल्या आणि कोरोनाचे नियम पायाखाली तुडवत कोरोनाचा प्रसार वाढला.दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्राण धोक्यात आणले गेले.कोरोनामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला असून याला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे.राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीने कोरोनाकडे दुर्लक्ष केले.

बेजबाबदारपणे निवडणुकीचे संकट मात्र भाजपने जनतेवर लादले.या राज हट्टाचा शिवस्वराज युवा संघटन निषेध करीत आहे शोध न्यूज असेही संदीपराजे मुटकुळे यांनी म्हटले आहे.      

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget