(रेमडेसिविर व इतर औषधांच्या खरेदी चे हक्क राज्यांना द्यावेत)
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
संपूर्ण देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. काल संपूर्ण देशात 3 लाखाचा आकडा मागे टाकला आहे. तर रेमडेसिवीर इंजेक्शनाची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वतः करणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. अवघ्या काही दिवसात त्यांनी मोदींना लिहिलेलं दुसरं पत्र आहे.
ही खरंच भीषण परिस्थिती आहे. एकत्र येऊन मुकाबला करण्याची ही वेळ आहे. भारताच्या इतिहासात इतकं मोठं संकट 100 वर्षात आलं नव्हतं हे आव्हान म्हणून फार मोठं आहे. अशातच बातमी वाचली की रेमडेसिवीर सारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनाची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वतः करणार आहे.
मला हे वाचून धक्काच बसला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारचे लोक लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. मग रेमडेसीविर सारख्या औषधांचं वितरण आणि खरेदी केंद्राकडे ठेवण्याचं प्रयोजन काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रेमडेसिवीर कसं घ्यायचं, कुठे आणि कसं वितरित करायचं याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी, ते केंद्र सरकारचं काम नाही, अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि प्रशासकिय यंत्रणांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यायला हवा. मला आशा आहे की माझ्या विनंतीचा तुम्ही सकारात्मक विचार कराल आणि राज्य सरकारांना प्रशासकीय स्वतंत्र द्याल, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.