सोलापूर // प्रतिनिधी
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या कोविड - १९ सेवा केंद्राच्या माध्यमातुन "कोरोना ब्रेक द चेन जनजागृती अभियान" आज सकाळी ९ वाजता विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथून सुरुवात करण्यात आली .
सोलापूरात कोरोना महामारीचे प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे . त्यासाठी शासन , प्रशासन विविध माध्यमातुन मा . मुख्यमंत्री उध्दवजी टाकरे साहेब यांनी केलेल्या "ब्रके द चेन" या आवाहनानुसार प्रयत्न करीत असताना दिसून येते . परंतु नागरिक व जीवनाश्यक विक्री करणाऱ्या दुकानदार कोरोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेत नसल्याने , बाजार पेठेत गर्दी वाढत आहे . म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने "ब्रेक द चेन" जनजागृती अभियान हाती घेतलेली आहे . सदर ब्रेक द चेन जनजागृती अभियान सकाळी ९ वाजता कामगार सेना कार्यालयापासून सुरुवात करुन "पुर्व विभागातील दत्त नगर, अशोक चौक, ७० फुट रोड भाजी मंडई, गेंट्याल चोक, शास्त्री नगर भाजी मंडई, भगतसिंग चौक , शास्त्री नगर परिसर , मौलाना आझाद चौक , पोटफाडी . पद्मशाली चौक , दाजी पेठ , जोडबसवण्णा भाजी मंडई , दत्त नगर ते कामगार सेना कार्यालय" येते समारोप करण्यात आला . या जनजागृती अभियानात दुचाकी मोटार सायकला मेघा फोनद्वारे कोरोना हटावचे नियम पालण्याचे आवाहन करण्यात आले .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कोरोना "ब्रेक द चेन" जनजागृती अभियानात दशरथ नंदाल , विठ्ठल कु -हाडकर , श्रीनिवास बोगा , पप्पु शेख , गणेश म्हंता , प्रशांत जक्का , अजय कारमपुरी आदिनी सहभाग घेतला .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.