गोकुळ दूध संघाचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश!




(ठरलेल्या वेळेनुसार मतदान प्रक्रिया पार पडणार)


कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज, मंगळवारी नकार दिला. देशात विधानसभा, ग्रामपंचायतीस अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका काही प्रमाणात सुरू आहेत. गोकुळची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीवरील असलेली टांगती तलवार दूर झाली आहे. त्यामुळे दोन मे रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.


दरम्यान गोकुळच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. शाहूवाडी आणि शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांचा कोरोनाने बळी घेतला तर हातकणंगले, आजरा तालुक्यातील आणखी चार ठरावधारकांनी चिंता वाढवली आहे. यातच जिल्हÎातील 40 ठरावधाकरकांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समजते. ते सर्व ठरावधारक क्वारंटाइन असल्याची माहिती काल, सोमवारी दुपारी समोर आली. त्यामुळे त्यांना क्वारंटाईनचा 14 दिवसांचा कार्यकाल पूर्ण करावा लागणार असल्याने या ठरावधारकांना मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget