सोलापूर // प्रतिनिधी
नातेवाईकांमधील किरकोळ वादातून आविंदा जब्बार शिंदे हिचा पेट्रोल अंगावर ओतून जाळून खून करून तिचा पती जब्बार आणि मुलगा रवींद्र शिंदे ( सर्व रा. माढा) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी सुभाष भानुदास शिंदे (रा. माढा) यास जामीन तर अटक नसलेला आरोपी रविंद्र जगदीश भोसले (रा. कुर्डुवाडी) यास अटकपूर्व जमीन बार्शी सत्र न्यायाधिश आर. एस. पाटील यांनी मंजूर केला आहे.
यात हकीगत अशी की , दि. २५/०८/२०२० रोजी फिर्यादी जब्बार भानुदास शिंदे हा त्याची पत्नी आविंदा आणि मुलगा रविंद्र यांच्यासह माढा येथे बाजारात जात असताना पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून सुभाष शिंदे व रविंद्र भोसले सह अन्य १२ आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी आविंदा हिच्या अंगावर दोन बाटल्या पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यावेळी तिला वाचविणार तिचा पती जब्बार आणि मुलगा रविंद्र यांच्यावर आरोपींनी काठ्या व लाथा-बुक्यांनी प्राणघातक हल्ला केला, अशी जब्बार शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माढा पोलीस ठाण्यात खून आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा सर्व आरोपींविरुद्ध दाखल झाला. त्या गुन्ह्यात सुभाष शिंदे यास अटक झाली तर गुन्हा घडल्यापासून रविंद्र भोसले हा फरार होता.
फिर्यादी जब्बारच्या कथानस वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुरावा साथ देत नसल्यामुळे फिर्याद विश्वासार्ह नसल्याचा *अॅड.अरविंद अंदोरे* यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला.
यात आरोपींतर्फे अॅड.अरविंद अंदोरे, अॅड.आल्हाद अंदोरे, अॅड.महेश लालसरे, अॅड.रजनी बोमेन, अॅड.स्नेहा पुळूजकर यांनी काम पाहिले तर सरकार तर्फे अॅड.प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.