मुंबई उच्च न्यायालयात विडी उद्योग वाचविण्यासाठी सरकारने आपली बाजू मांडावे.:- विष्णु कारमपुरी (महाराज)




सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना महामारी काळात विडी विक्रीवर बंदी आणावी अशा मागणीचे जनहित याचिका स्नेहा मारजाडी यांनी दाखल केले आहे . त्या संदर्भी ४ मे २०२१ रोजी सरकारी बाजू मांडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश श्री . जी . एस . कुलकर्णी यांनी दिली आहे . म्हणून सरकारी बाजू मांडताना विडी उद्योगावर अवलंबून असलेल्या कामगारांचे विचार होणे अत्यंत आवश्यक आहे . त्याच बरोबर विडीच्या धुम्रपानामुळे कोरोना संक्रमण होत नाही . हे ही कोर्टास पाठवून देण्याचा आहे . म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विडी उद्योग वाचविण्यासाठी आणि कामगार वाचविण्यसाठी विनंती निवेदन *मा . ना . मुख्यमंत्री , मा . ना . उपमुख्यमंत्री , मा . ना . कामगार मंत्री , मा . ना . कामगार राज्यमंत्री , मा . ना . आरोग्य मंत्री , मा . ना . आरोग्य राज्यमंत्री , मा . ना . पालकमंत्री सोलापूर जिल्हा , मा . राज्य कामगार आयुक्त* यांना पाठविले आहे . त्याच बरोबर कामगार सचिव कामगार आयुक्त आणि सर्व मंत्र्यांच्या सचिवांना भ्रमणध्वनी वरुन माहिती देण्यात आली आहे . अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे . 

           मा . मुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारी प्रादुर्भावास विडी व सिगारेट धुमपानाचे प्रदुषण कोरोनाला पोषक ठरणारा आहे . म्हणजेच विडी व सिगारेट विक्रीस तात्पुरते बंदी घालण्यात यावी . अशा मागणीचे जनहित याचिका स्नेहा मारजाडी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे . या जनहित याचिके बाबत दि . ०४ मे २०२१ रोजी सरकारी बाजु मांडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश श्री . जी . एस . कुलकर्णी यांनी दिली आहे . 

         सदर याचिके बाबत आपणांस विनंती निवेदन देण्यात येते की , विडी उद्योगात महाराष्ट्रात सुमारे ५ लाख कामगार काम करतात सोलापुरात ७० ते ८० हजार कामगार या उद्योगात काम करतांत सध्या सोलापूरात कामगारांचे उपजिविकेचे साधन केवळ विडी उद्योग हा एकमेव उद्योग उरला आहे . तोही उद्योग बंद पडण्याचा मार्गावर आहे . अशा परिस्थितीत विडी विक्री बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत सरकारचे बाजु मांडतांना खालील मुद्दे मांडणे अत्यंत महत्वाचे व आवश्यक आहेत . 

महत्वाचे मुद्दे : १. विडी उत्पादन व विक्रीमुळे कुठल्याही व्यक्तीस कोरोना झाला असा निष्कर्ष अद्यापही प्राप्त झालेल नाही . २.दिल्ली येथील काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च ( CSIR ) या संस्थेने अभ्यास करुन विडी धुम्रपानाने कोरोना संक्रमण होणेचे प्रमाण कमी आहे . असे संशोधन केले आहे . त्याचबरोबर विडी धुमपानाने कोरोनाला सघर्ष करण्यासाठी प्रतिरोधक शक्ती प्राप्त होतो असेहो नमुद केले आहे . याबाबतचे अहवाल आपणांस महितोत्सव सोबत जोडत आहेत . ३. विडी उत्पादन हे मानवनिर्मित असून ( मॅन्युवल ) या उद्योगात ९ ० % महिला कामगार काम करुन आपले कुटुंब चालवितातः ४. विडी उद्योग हे महाराष्ट्रात गेल्या १५० वर्षापासून अस्थित्वात आहे . सदर उद्योग बंद पडल्यास विडी कामगार व त्यांचे कुंटुंबिय उध्वस्त होण्याची भिती आहे . ५. विडी उद्योग बंद पडल्यास विडी उद्योगास निगडीत असलेले महाराष्ट्रातील १५ ते २० लाख कामगार बेकार होण्याचे भिती आहे.

         तरी माननीयांनी अशा व इतर अनेक समस्या विडी उद्योग बंद पडल्यास निर्माण होतात . म्हणुन स्नेहा मारजाडी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिके बाबत सरकारची बाजु विडी उद्योग बंद पडू नये अशा आशयाची बाजु मांडुन गोर गरीब महिला विडी कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना वाचवावे . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget