सोलापूर // प्रतिनिधी
श्री संत दामाजी सह.साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये दि.१/२/२०२१ते दि.१५/२/२०२१ या पंधरवाड्यात गळीतास आलेल्या ऊसास प्र.मे.टन रु.१५००/- प्रमाणे ऍडव्हान्स बील संबंधीत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या बँकेतील खात्यावर वर्ग केले असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. झुंजार आसबे यांनी दिली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.झुंजार आसबे म्हणाले कि, सन २०२०-२१ हंगामात साखर विक्रीतून ऊस बिले, कामगार पगार , तोडणी वाहतुक बिले दिलेली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्याचीएफ आर पी प्रमाणे राहिलेली रक्कम बिल लवकरच देण्याची व्यवस्था करित आहोत.
ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्याचे मागणीनुसार समर्थ सह.बँक,बँक ऑफ महाराष्ट्र,भारतीय स्टेट बँक, सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक, राजमाता अर्बन बँक, धनश्री पतसंस्था, यशोदा पतसंस्था, बबनराव आवताडे पतसंस्था इत्यादी बँका, पतसंस्थाचे शाखामध्ये ऊस बीलाचा ऍडव्हान्स हप्ता प्र.मे.टन रु.१५००/- प्रमाणे वर्ग कलेला आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे वर्क्स मनेजर-सुहास शिनगारे, चिफ केमिस्ट-मोहन पवार,चिफ अकौंटंट-रमेश गणेशकर,मुख्य शेती अधिकारी-रमेशपवार, कार्यालय अधिक्षक-दगडु फटे,हेडटाईम किपर-आप्पासो शिनगारे, स्टोअर किपर-उत्तम भुसे कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठ्ल गायकवाड, कामगार पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतककरी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.