साक्षात!पांडुरंगच दामाजीच्या भेटीला आला!!





सोलापूर // प्रतिनिधी

पंढरीच्या पांडुरंगाची आणि  मंगळवेढ्याच्या दामाजीची भेट झाल्यामुळे पोट निवडणुकीला  आषाढीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अवघ्या महाराष्ट्रातले राजकारणी चंद्रभागेच्या पश्‍चिम तिरावर विसावले आहेत. वाळवंटी मतदानाचे भजन करीत वैष्णवाचा मेळा डोळ्यात साठवून विकास नामाचे गीत गात आहेत. वीज बिल भरले नाही म्हणून गाव डि.पी खाली उतरवला आणि शेकडो ग्राहकांची वीज तोडली तरी देखील कॅनवाय गाड्यांच्या उजेडात ग्रामिण भागा नाहुन निघाला आहे. वीजेची उणीव भासत नाही. गरिबांचे बरे चालले आहे.

        कारण सतत घोषणाचा उजेड पडतोय जेऊरचा कारखाना कुणी  घेतला हा विषय महत्वाचा नाही तर कारखाना सेवा किती प्रभावी देतोय हे अधिक महत्वाचे आहे. भांडवल मोठे लागते गोविंद बापूनी पायात पायतन घातले नव्हते. ऊस उत्पादकांची सेवा चांगली झाली. शेतकऱ्याकडून स्वागतच होईल. कामगारांचा पगार झाला तर गरिब माणूस सुखाऊन जाईल थोडा आधार वाटेल. म्हणून चोखोबा समाधी भरून पावली!

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget