२५२-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज




(कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात)


सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक निर्भय , नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

252-पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 1 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार  व 1 लाख 62 हजार 694 स्त्री मतदार तसेच इतर 5 असे एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. मतदारसंघात 524 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र 196 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट व 524 व्हीहीपॅट मशीन असणार आहेत. तसेच 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  निवडणुकीसाठी  2552  अधिकारी - कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी 94 एसटी बसेस व तीन जीपची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा बीज पुरवठा, शौचालय,  दिव्यांगासाठी रॅमची सुविधा करण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली  आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget