सोलापूर // प्रतिनिधी
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शिवभोजन योजनेतून गरजुना शिवभोजन थाळी एक महीना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर सहकारी रुग्णालय शेजारील व अश्विनी हॉस्पिटल शेजारील शिवभोजन केंद्रांना भेट देऊन शिवभोजन थाळी चे वाटप व्यवस्थित होते की नाही त्यांची पाहणी केली आणि चालकांना सूचना केल्या. विनामूल्य शिवभोजन थाळीचा गरजुनी लाभ घेण्याचे आवाहन ही केले आहे.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी बांधकाम कामगार, परवानाधारक रिक्षा, दिव्यांग, निराधाराना पेंशन, संजय गांधी, श्रावण बाळ, घरेलू कामगार लाभार्थ्यांना दोन महिन्याचे पेंशन आगाऊ मिळणार आहे. त्याच प्रमाणे अन्नसुरक्षा लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून पिवळा आणि केसरी रेशन कार्डधारकांना 3 किलो गहु व 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महीना मोफत मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले आहे.
तसेच विडी व यंत्रमाग कामगारांना लॉक डाउन च्या काळात शासनाकडून 2000 रुपये आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.