विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची सामाजिक बांधिलकी-

 



कारखान्यामार्फत कोव्हीड सेंटरसाठी ऑक्सिजन मशिनचा पुरवठा- आ. बबनराव शिंदे


सोलापूर // प्रतिनिधी

संपूर्ण जग कोरोना वैश्विक महामारीशी लढा देत असताना आपल्या देशात व राज्यामध्ये कोरोना या विषाणूचा दुस-या लाटेचा प्रादुर्भाव झालेला असून कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून माढा मतदारसंघातील कोव्हीड सेंटरमधील कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत कुर्डूवाडी,माढा, टेंभूर्णी व मोडनिंब येथे सुरू असलेल्या कोव्हीड सेंटरसाठी 10 ऑक्सिजन मशिनचा पुरवठा करण्यात आला असून आणखी मशीन देण्यात येणार असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे  यांनी दिली.


अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले कोरोनाचे पार्श्वभुमीवर कोरोनाग्रस्तांवर वेगवेगळ्या उपचार पध्दती करुन त्यावर मात केली जात आहे.आपले सोलापूर जिल्हामध्ये कोरोनाच्या दूस-या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असून माढा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेनदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील श्रीराम मंगल कार्यालय, कुर्डूवाडी, शासकीय वसतिगृह कुर्डूवाडी, शासकीय वसतिगृह माढा, संकेत मंगल कार्यालय, टेंभूर्णी,संत सावतामाळी मंगल कार्यालय,टेंभूर्णी, शिवपार्वती मंगल कार्यालय, मोडनिंब येथे कोव्हीड रूग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत.


माढा मतदारसंघातील कुर्डूवाडी, माढा, टेंभूर्णी व मोडनिंब या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरसाठी एकुण 10 ऑक्सिजन मशिनचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच आणखी 5 मशिनची खरेदी करून कारखान्यामार्फत कोव्हीड सेंटरसाठी पुरविण्याचे दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. सध्या सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा भासत असून ऑक्सीजन अभावी रूग्ण दगावण्याची शक्यता आहे. कोव्हीड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोना रूग्णांपैकी ज्या रूग्णांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत त्यांना या मशिनच्या साहाय्याने ऑक्सीजन पुरविला जाणार आहे.त्यामुळे रूग्णांची फार मोठी सोय झालेली असून रूग्णांचे प्राण वाचणे हे महत्त्वाचे आहे. सदर मशिन हवेतून ऑक्सिजन घेवून त्यावर कार्य करत असल्याने त्यास ऑक्सीजन सिलेंडरची वेगळी गरज नाही  यामुळे रुग्णाला ही मशीन वाचवण्यामध्ये मोठी मदत करते आहे अशी माहीती आ.शिंदे यांनी दिली.



तसेच मागील वर्षी देखील माढा,कुर्डवाडी,महाळुंग या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरसाठी कारखान्यामार्फत ऑक्सिजन मशीनचा पुरवठा करण्यात आलेला होता. त्यामुळे कोव्हीड रूग्णांना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करणे सोईचे झाले होते. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने नेहमी मानवतावादी दृष्टीकोन व सामाजिक बांधिलकी जपून गरजूंना मदतीचा हात दिलेला आहे.कोरोना पार्श्वभूमीवर कारखान्याने नेहमी सक्रीय सहभाग देवून सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने मागील वर्षी माढा मतदारसंघामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून 2 हजार 500 रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. कोरोना या आजाराचे पार्श्वभुमीवर सर्वांनी जरूर ती दक्षता घ्यावी अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

सदरप्रसंगी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक एस.आर.यादव व खातेप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget