आमदार प्रणिती शिंदे यांच्यावतीने आयोजित
सोलापूर // प्रतिनिधी
आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूरातील यंत्रमाग कामगारांकरीता रविवार, दि. 18 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत सोलापूरातील यंत्रमाग कामगारांकरीता सोलापूर यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी., सोलापूर येथे मोफत अँटीजेन टेस्ट शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सोलापूरातील सर्व यंत्रमाग कारखानदारांनी आपल्या कारखान्यातील सर्व कामगारांचे कोव्हिड-19 अँटीजेन टेस्ट करून घेतले. यामुळे सदर कामगारांना यंत्रमाग कारखान्यामध्ये काम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
या शिबीरामुळे सोलापूरातील शेकडो गोर-गरीब यंत्रमाग कामगारांना अत्यंत मोलाची मदत झाली असल्याने अनेकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आधार मानले.
यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. धनराज पांडे, सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे श्री. पेंटप्पा गड्डम, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे श्री. श्रीधर बोल्ली, श्री. निलेश फोफलिया, श्री. रमेश ढाकलिया, श्री. सुधाकर गुंडेली, श्री. अमर देवसानी, श्री. विकास गड्डम, श्री. सुरेश नक्का, श्री. लक्ष्मीनारायण दासरी, श्री. लक्ष्मीकांत साका, श्री. नागेश बोमड्याल, श्री. तिरुपती परकीपंडला, श्री. ओंकार अडगटला, श्री. सन्नी मडूर, श्री. विजयकुमार हलकट्टी, श्री. सिध्दू अल्ली, श्री. अशोक वडनाल, श्री. भूषण येलें, श्री. राजय्या गज्जम, आदि. बहुसंख्य कारखानदार व कामगार उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.