कोरोना काळात आर्थीक अडचनीच वृद्ध साहित्यिक कलावंतांचा पगार सरकारने त्वरीत द्यावा -विश्व वारकरी सेना




विश्व वारकरी सेनेच्या वतीने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , गृहमंत्री,पालकमंत्री ,अकोला जिल्हाधिकारी  यांना ई मेल द्वारे निवेदन 

सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजनांतील 1428.50 कोटी निधी वितरित मात्र 


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू कडक निर्बंधांच्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष पॅकेज मधून वृद्ध साहित्यिक कलावंतांच्या पगाराचा विसर पडलेला आहे त्यांना पेंशन मिळावे यासाठी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री गणेश महाराज शेटे यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , गृहमंत्री,पालकमंत्री ,अकोला जिल्हाधिकारी  यांना ई मेल द्वारे निवेदन पाठविले आहे   कारण  सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील 35 लाख लाभार्थींना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार प्रमाणे दोन महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी 1428.50 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे मात्र वृद्ध साहित्यिक कलावंतांना  वगळण्यात आले आहे . 


ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरीही वृद्ध साहित्यिक कलावंतांना   मात्र मानधनची अपेक्षा आहे . 

कोरोना प्रतिबंधक नियमावली संदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्यानुसार या 5 योजनांसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.  मात्र  राज्यातील वृद्ध साहित्यिक कलावंतांनाही निधी उपलब्ध केला असता तर त्यांचे  कोरोना काळातील जीवन सुखात गेले असते मात्र शासनाला यांचाच विसर पडलेला आहे  

दरम्यान कोरोनाचा वाढता कहर व त्यात लागू निर्बंधांमुळे प्राप्त कठीण परिस्थितीत या योजनांमधील राज्यातील लाभार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे.मात्र वृद्ध साहित्यिक कलावंतांना  मात्र जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहेत असा आरोप विश्व वारकरी सेनेच्या वतीने करण्यात  आला  असुन सारकारणे यांच्या परीस्थितीचा गांभिर्याने विचार करून गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले वेतन त्वरीत द्यावे हि विनंती करण्यात येत आहे की जेणेकरून कोरोना काळात अनेक कलावंत मंडळी आर्थीक संकटाचा सामना करीत आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना आधार मीळेल

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget