पंढरपूर // प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी शहरातील अनेक प्रतिष्ठित नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानीही अजित पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. केवळ पाठिंबा नाही तर मनसेचे स्थानिक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारदेखील करत आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड झालं आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरची जागा रिक्त झाली होती. याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.