पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी


   


पंढरपूर // प्रतिनिधी 
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर शहरात प्रचार फेरी काढली, 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता त्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्या नंतर इंदिरा गांधी चौकात प्रचार रॅलीला सुरुवात झाली ही रॅली इंदिरा गांधी चौकातून सुरू झाली पुढे अर्बन बँक ,दाळे गल्ली,, कडबे गल्ली, कैकाडी महाराज मठ परिसर,, डोंबे गल्ली परिसर ,अनिल नगर परिसर कॉटेज परिसरातून  ही प्रचार रॅली निघाली फटाक्यांची आतिषबाजी आणि हलग्यांच्या  निनादात निघालेल्या या रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता, नागरिक आपल्या दारासमोर थांबून उमेदवार समाधान आवताडे आमदार प्रशांत परिचारक यांना औक्षण करत होते ठीक ठिकाणी  हार घालून त्यांचे स्वागत करत होते याच भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांची उमेदवार समाधान आवताडे यांनी भेट घेतली, या रॅलीत नागेश भोसले, शिवाजी कोळी, नानासाहेब सगरे, उपनगराध्यक्ष निलराज डोंबे, श्रीनिवास बोरगावकर, मुन्नागिर गोसावी,  संतोष जाधव, महादेव कवडे ,विकास मोरे ,विजय वाघ, अनंत कटाप,  भैय्या भिंगे, दत्ता काळे, भाऊसाहेब शिंदे नाईक, यांच्यासह परिचारक गटाचे आजी-माजी नगरसेवक पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक, बाजार समितीचे संचालक ,पंढरपूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget