कोविडच्या वैद्यकीय सोई-सुविधेसाठी छावाचे योगेश पवार यांचे नग्न आंदोलन




सोलापुर // प्रतिनिधी 

कोविड-19 च्या वैद्यकीय आपत्तीमध्ये वैद्यकीय सेवा-सुविधा देण्यास कमी पडणार्‍या शासन आणि प्रशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी प्रतीनिधिक स्वरुपात नवी पेठ, सोलापूर येथे नग्न आंदोलन केले. नग्न आंदोलनावेळी पवार यांनी अंगावर निषेध नोंदवून बेड, इंजेक्शन, वेक्सीनचे चित्र काढले होते.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की., वैद्यकीय सेवा-सुविधा आणि रेमडीसिवरचा कृत्रिम काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावाचे योगेश पवार यांनी, दि. 14/04/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गेटसमोर, नग्न आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. परंतु, सदर नग्न आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही शासनाचा निषेधार्थ योगेश पवार यांनी खाजगी जागेत नग्न आंदोलन केले. कोविड 19 च्या आपत्तीमध्ये शासन आणि प्रशासनाच्या नियोजन शून्यतेचा फटका सामान्य जनतेस बसला असून मार्च 2020 पासून शासनाने आणि सोलापूर प्रशासनाने लोकसंख्येच्या विचार करून वैद्यकीय सेवा व सुविधा देण्याबाबत कोणतेही ठोस व्यवस्था केली नाही. त्यामुळे सध्या सोलापूरसह समस्त राज्यात रेमडीसिवर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड याचा तुटवडा भासत आहे. कृत्रिम तुटवडा व समस्याबाबत प्रशासनाने एक समिती स्थापन केली आणि एका दिवसांतच जातीपातीचं राजकारण करून त्या समितीवरून प्रांताधिकारी निकम यांना काढून त्यांचे ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी यांची निवडण्यात आले. ही समितीच कोविड पेशंट व त्यांच्या नातेवाइकासाठी एक मोठी समस्या आहे. आजघडीस कोणत्याही कोविड हॉस्पिटलमध्ये (DCH) इंजेक्शनची सोय नाही. पेशंटच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये जावून 24-24 थांबूनही इंजेक्शन भेटत नाही. सामान्य जनतेस तर बेड आणि ऑक्सिजन दोन्हीही भेटत नाही, यासमितीच्या या तुटवडयाबाबत शासन अद्यापही ठोस अशी भूमिका घेत नाही. याचा फायदा घेवून साठेबाज मेडिकलवाले आणि नफेखोर खाजगी हॉस्पिटलवाले स्वत:च्या फायद्यासाठी कोविड पेशंट आणि सामान्य जनतेस लुबाडत आहेत, याचा निषेध नोंदवण्यासाठी योगेश पवार यांनी नग्न आंदोलन केले.

 केंद्र व राज्याच्या राजकारणामुळे दोन-तीन दिवसापासून कोविड वेक्सीनचे लसीकरणही मंदावल्याचे नमूद करून वैद्यकीय आपत्ती आणीबाणी घोषित करून पुण्यातील सिरम कंपनी राज्य शासनाने ताब्यात घेवून तेथील दोन-कोटी वेक्सीन साठा जनतेच्या लसीकरणास उपलब्ध करून द्यावा. राज्यातील सर्वच खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेवून वैद्यकीय सेवा-सुविधेचा कृत्रिम तुटवडा दूर करून काळाबाजार व नफेखोरी करणार्‍या हॉस्पिटल व मेडिकलवर गुन्हे नोंदवण्याची मागणी यावेळी योगेश पवार यांनी केली. तसेच ह्या वैद्यकीय आपत्ती व आणीबाणीमध्ये आणि आजपासून रात्रीपासून होणार्‍या 15 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये सर्वसामान्य जनता शासनासोबत असल्याचे सांगून शासनानेही जनतेच्या मागे उभे राहून जनतेस वैद्यकीय सेवा-सुविधा देण्याची तजवीज करून संविधानातील मूलभूत कर्तव्ये पार पाडण्याची विनंती छावाचे योगेश पवार यांचेकडून यावेळी करण्यात आली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget