लाॅकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ लाॅकडाऊन चा आदेश मागे घेऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या - अमर पवार




सोलापूर // प्रतिनिधी

एकदम 30 एप्रिल पर्यंत केलेल्या लाॅकडाऊन चा आदेश मागे घेऊन सर्व दुकाने सकाळी नऊ ते सात या वेळेत चालु ठेवण्यास परवानगी द्यावी असे निवेदन रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमर पवार यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले.


एकदम ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे,त्यामध्ये अनेक छोट्या व्यावसायीकांचे खूप नुकसान होणार आहे व त्यांचेवर उपासमारीची वेळ येणार आहे तसेच इतर बंद दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावरती देखील उपासमारीची वेळ येणार आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर आहे परंतु काही निष्काळजी लोकांमुळे आज ही वेळ आली आहे व वारंवार आवाहन करून सुद्धा गर्दी कमी होत नाही. जे व्यापारी निष्काळजीपणा करत आहेत त्यांचेवर व बेजबाबदार नागरिकावर कठोरातील कठोर कारवाई करावी. कारवाईच्या भितीमुळे इतर लोक काळजी करतील. लाॅकडाऊनमुळे  गोरगरीब नागरिकावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.शेतकरी वर्ग सुद्धा अडचणीत आला आहे.

           तरी आपणास विनंती की आपण सुधारित आदेश काढून (ज्या ठिकाणी सर्व्हिस दिली जाते ते सर्व व्यवसाय वगळून) सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी द्यावी असे  निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget