अखेर दहावीच्या परीक्षा रद्द




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, शिक्षम सचिव आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा केली. या बैठकीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams 2021) घेण्या न घेण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीमध्ये परीक्षा घेण्याच्या शक्यतेविषयी एक आराखडा पंतप्रधानांसमोर मांडण्यात आला. गेल्यावर्षीप्रमाणे ऑनलाइन परीक्षांचा मुद्दाही यामध्ये होता. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता CBSE Board Exams 2021 रद्द करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अधिकाऱ्यांध्ये ही महत्त्वाची चर्चा पार पडली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget