सोलापूर // प्रतिनिधी
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पद्मशाली चौक येथील कामगार सेना कार्यालयात मा . बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करण्यात आली.
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्याहस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले . त्यानंतर कारमपुरी ( महाराज ) यांनी बाबासाहेबांच्या बद्दल म्हणाले की , बाबासाहेब हे भारत देशाचे घटनेचे शिल्पकार तर आहेच त्याहुनी अत्यंत मोलाचे त्यांचे कार्य म्हणजे समाजातील अत्यंत तळा गाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न हे संपूर्ण मानव जातीला समानतेचा हक्क प्राप्त करुन दिले आहे . अश्या महामानवाला कोटी - कोटी प्रणाम असे म्हणाले .
सदर प्रसंगी श्रीनिवास चिलवेरी , विठ्ठल कुऱ्हाडकर , श्रीनिवास बोगा , पप्पु शेख , गणेश म्हंता , रमेश चिलवेरी , संजीव शेट्टी , शोभा पोला , रेखा आडकी , अर्चना सग्गम , संध्याराणी कुऱ्हाडकर यांनी उपस्थित होते .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.