सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील प्रचाराचं रणयुग चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सर यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली असून रेणू शर्मा प्रकरणावरून मुंडेंना चांगलच धारेवर धरलं आहे.
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात सभा झाली. या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये रेणू शर्माप्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. “माय बहीण करवली म्हणून आली. धनंजय मुंडे म्हणाले, वहिनी तुम्ही आलात म्हणजे ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय सारखच. दोघी बहिणी बहिणी एकत्र राहावा. मग एकदा वीज कनेक्शन घेतलं की मीटर पडणारच. मीटर पडलं. दोन पोरं झाली. त्या दोन पोरांना आपलं नाव दिलं. त्यांना विचारलं अरे तू नाव कसं देतोस? तेव्हा ते म्हणाले, मला अजिबात भीती वाटत नाही. महाराष्ट्रातील माझा लाडका नेता पुरोगामी आहे. असे नवीन विषय पुरोगामीत्वाचे स्वीकारले पाहिजे. असं सांगतानाच भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते. पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही”, अशी घणाघाती टीका ढोबळे यांनी केली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.