कोल्हापूर जिल्ह्यातील एका चांदी व्यापाराचा पिस्तुलातून गोळी सुटून चुकीच्या पद्धतीने मृत्यू!




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

चंदेरी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरांमध्ये उद्योजकांना भारतातील प्रत्येक राज्यामध्ये आपल्या सोन्या-चांदीचे दागिने व्यापार पेठेमध्ये पोहोच करावयास जावे लागते. यामध्ये आपले स्वसंरक्षण व आपल्या जवळील मौल्यवान वस्तूची संरक्षण व्हावे या हेतूने काही व्यापाऱ्यांनी आपल्याजवळ बंदुकांचे परवाने तसेच हत्यारे बाळगले असतात. अशा मधीलच एक सुनील विद्यासागर गाट रहाणार हुपरी यांचा मुलगा सागर सुनिल गाट (वय वर्ष 27) राहणार शांतीनगर हुपरी हे घरातील वडिलांची पिस्तूल साफ करण्यात मग्न होते यावेळी त्यातून अचानक गोळी सुटून सागर याच्या शरीराला इजा झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून घरातील नातेवाईकांनी सागर यास एका कोल्हापूरच्या  हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र ते उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता मृत सागर याचा मुलगा सिद्ध याचा आज जन्मदिवस होता यावेळेस सागर वर काळाने घाला घातला या घटनेने हुपरी शहरात संपूर्ण शोककळा पसरली या घटनास्थळी  हुपरी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मस्केसो पोलीस उपनिरीक्षक पल्लवी यादव व मस्कर तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचारी दाखल झाले होते.


या घटनास्थळी काही जणांचे पोलीस आणि जाबजबाब घेतले तसेच इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री बाबुराव महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृत सागरचा मृतदेह शवविछेदन कोल्हापुर येथे करण्यात आले वडील सुनील गाठ हे एक प्रसिद्ध चांदी उद्योजक आहेत. यामुळे या कुटुंबातील सागरचा झालेल्या आशा मृत्यू होणे चांदी उद्योजक क्षेत्रात  या व्यवसायाशी संबधीत असणाऱ्या गावांमध्ये सागर यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे या आणी अशा घटनेचा अधिक तपास हुपरी पोलिस हे करत आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget