सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शनी सेल यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कोरोना प्रादुर्भावामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी "मदतीचा एक घास" मोफत जेवण वाटप उपक्रमाची सुरूवात करण्यात आली होती आज रोजी मदतीचा एक घास उपक्रमाचा दूसरा दिवस होता. आमदार प्रणिती शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते जेवण वाटप करण्यात आले. शहरातील श्री जांबमुनी चौक लष्कर, सुनील नगर, रामवाड़ी, मौलाली चौक, मल्लिकार्जुन नगर सुत मिल, 70 फुट रोड कुमठा नाका, सिव्हिल हॉस्पिटल, मोदी चौक या भागासह आज पाच नवीन ठिकाणी
स्लाटर हाउस, रेवसिद्धेश्वर नगर, जगजीवनराम झोपड़पट्टी, आम्रपाली चौक, इरण्णा वस्ती, शास्त्री नगर या ठिकाणी तसेच काहीना घरोघरी जाऊन जवळपास 1500 नागरिकांना मोफत जेवण वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी महिला काँग्रेस, प्रियदर्शिनी सेल, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व देणगीदार यांचे सहकार्य लाभत आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.