माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील नॅशनल हायवे हा शहराच्या बाहेरून गेल्यामुळे शहरातून जाणारा सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या दुरावस्था झालेल्या रस्त्यासाठी तसेच आढेगाव या ठिकाणी भुयारी मार्ग करणे या कामासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिलेली असूनही निधीअभावी रस्त्याचे काम सुरू झालेले नव्हते या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची तरतूद होण्यासाठी पत्रव्यवहार करून वारंवार पाठपुरावा केलेला होता त्यानुसार दोन्ही कामासाठी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांनी 70 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी यावेळी दिली
याबाबत अधिक माहिती अशी की 26 मार्च 2016 रोजी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून सोलापूर विभागातील पाच हजार 700 कोटी रुपयांच्या नॅशनल हायवेच्या कोंनशिला समारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते सोलापूर येथे करण्यात आलेला होता यामध्ये माढा तालुक्यातील मौजे टेंभुर्णी या शहरातून जाणाऱ्या एन एच 65 जुना नॅशनल हायवे क्रमांक 9 या सहा किलोमीटर रस्त्याच्या कामाचा समावेश होता परंतु सुंदर रस्त्याला निधीची तरतूद नसल्यामुळे प्रत्यक्ष कामात सुरुवात झालेली नाही सद्यस्थितीत टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात घडण्याचे प्रमाण वाढत होते त्यामुळे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून निधीची तरतूद करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार बबनराव शिंदे यांनी मागणी केली होती त्यानुसार मौजे टेंभुर्णी येथील सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 50 कोटी रुपये व आढेगाव येथील भुयारी मार्गासाठी वीस कोटी रुपये असे एकूण 70 कोटी रुपयांचा निधी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून मंजूर झाला याबद्दल
आमदार शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत
सदरचा निधी मंजूर झाल्यामुळे टेंभुर्णी आढेगाव येथील दोन्ही कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचेही आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.
टेंभुर्णी शहरातील रस्ता दुरुस्ती बाबत माढा तालुक्याचे आ. बबनदादा शिंदे, आ.संजयमामा शिंदे ,जि प सदस्य शिवाजी पाटील ,टेंभुर्णी गावचे सरपंच प्रमोद कुटे, संजय पाटील भिमानगरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील,शिवसेना नेते संजय कोकाटे, यांच्यासह सामाजिक संघटना विविध राजकीय पक्षांनी निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते निधी मंजूर झाल्यामुळे टेंभुर्णी परिसरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.