सोलापूर शहर-जिल्हा,काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज प्रकाश यलगुलवार यांच्या वतीने सोलापुरातील गरजु बास्केटबॉल खेळाडूना मदत.




सोलापूर // प्रतिनिधी 

सध्याच्या काळात कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यवस्था ठप्प झालेली असताना, रोजगार बंद असल्यामुळे नागरिकांना, खेळाडूना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागतआहे. सध्याच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोलापूर शहर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी नगरसेवक, मनोज प्रकाश यलगुलवार यांच्या वतीने या गरजू बास्केटबॉल खेळाडूना एक छोटीशी मदत म्हणून आर्थिक सहाय्य केले. आपण या क्रीड़ाक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्रातील गरजू खेळाडूसाठि खारीचा वाटा म्हणून मदत करीत आहोत अशा भावना मनोज प्रकाश यलगुलवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.


याप्रसंगी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मनोज प्रकाश यलगुलवार, प्रसिद्धीप्रमुख तिरुपती परकीपंडला, क्रीड़ा प्रशिक्षक दिनेश सारंगी, राजेन्द्र नारायणकर, गिरीश गड्डम, ईश्वर अलवाल, अंकुश कट्टा, शाम सायरी, गुरुचरण बत्तूल, आकाश गोली आदि उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget