कामगार सेनेचे जन जागृती अभियानाद्वारे नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आहवान





सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सुरु असलेल्या कोरोना हटाव जनजागृती अभियान सुरु असून या अभियानाद्वारे महाराष्ट्र  कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी भाजी मार्केट व  बाजार पेठ व गर्दीच्या ठिकाणी ग्राहक व विक्रेत्यांना कोराना नियम पाळण्याचे आवाहन करीत स्वतः मास्क नाही अशांना मास्कही वाटप केले .
          शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सुरु असलेल्या कोरोना हटाव जनजागृती अभियानाअंतर्गत दिनांक 20 एप्रिल 2021 पासून 1 मे 2021 पर्यंत असे सुमारे 12 दिवस करण्यात आलेला जनजागृती अभियानात सोलापुरातील जोडबसवण्णा चौक भाजी मंडई, 70 फुट रोड भाजी मंडई,  अशोक चौक बाजार पेठ, शास्त्री नगर भाजी मंडई, दत्त नगर, लक्ष्मी भाजी मार्केट, मधला मारुती बाजार पेठ, चाटी गल्ली, कस्तूरबा मार्केट, रेल्वे लाईन, जुळे सोलापुर डी मार्ट बाजार पेठ, आसरा चौक, सुनील नगर, एमआयडीसी सुपर मार्केट, भैया चौक, आवंती नगर, भवानी पेठ भाजी मंडई, गांधी नगर आणि इतर सर्व  मुख्य बाजार पेठात व भाजी मंडईत जन जागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानामुळे नागरिक व  जनतेतून कामगार सेनेच्या जनजागृती उपक्रमाबद्दल गौरव करण्यात आले. या कार्यक्रमास व्यापारी, नागरिक बंधू-भगिनी, पोलीस खाते, प्रसिद्धीमाध्यमे चांगल्या प्रकारे सहकार्य केले.
             विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या जनजागृती अभियानात दशरत नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर,  श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, गुरुनाथ कोळी, अजय कारमपुरी, गणेश म्हंता, संजीव शेट्टी, प्रसाद जगताप, संतोष जाधव, नागार्जुन कुसुरकर आदी कामगार सेनेचे पदाधिकारी सहभाग झाले.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget