मागील अनेक दिवसापासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या ईनोवा गाडीवर पेट्रोल टाकून जाळून,घरावर अज्ञाताकडून हल्ला करण्याचा प्रयत्न आज मंगळवार 26 मेला पहाटे 3 वाजायच्या सुमारास घडला आहे.
संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते, रात्री दीड वाजता ते घरी परतले होते. त्यानंतर 3 वाजायच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन पेट्रोल टाकून ईनोवा गाडी पेटवून दिली. त्या गाडीच्या जवळ 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या, एक गाडी पेटली तर सर्व वाहने पेटतील आणि गायकवाड यांच्या घर क्षतिग्रस्त होऊन परिवाराला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी तोडला होता, असाही कयास व्यक्त होत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी शोध सुरू केला आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, ही घटना जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही गंभीरतेने घेतली आहे.
दरम्यान, कोरोना काळात उपास-तापास करू नका. आता तुमच्या कामात देवही येणार नाही. कारण की देवाने आपला दरवाजा बंद केलेला आहे. म्हणून मांसाहार करा, असे आवाहन आमदार गायकवाड त्यांनी जाहीरपणे केले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गायकवाड यांनी स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटर मधील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी व बॉईल अंड्यांच्या आहाराचे वाटप केले होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांन विषयी ही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर बुलडाण्यामध्ये भाजव व शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला होता.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.