करमाळा ( विजय निकत )करमाळा तालुक्याचे राजकारण फारच गुंतागुतींचे असले तरी सध्या नेते मंडळी आपआपल्या सोयीचे राजकारण करताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीत भाजप शी सलगी केलेले तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नुकतीच महाराष्ट्र कॉंग्रेस चे महत्वाचे नेते महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सुमारे पंधरा ते वीस मिनिटे चर्चा करून त्यांचेकडून कॉंग्रेस चा कानमंत्र घेतला असतांनाच बौद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने करमाळा कृषि उत्प्नन बाजार समिती चे परिसरामध्ये मा. आमदार श्रीमती शामल बागल यांचे पुत्र मकाइचे चेअरमन दिग्विजय बागल व जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि.प सदस्य निळकंठ देशमुख युवक नेते अजित तळेकर यांची भेट झाली व बराच वेळ चर्चा सुद्धा झाली यावेळी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने निसर्गामध्ये ऑक्सिजन प्रवाहीत करणाऱ्या (बोधिवृक्ष) पिंपळाच्या वृक्षाचे रोप बागल यांनी भेट दिल्याने ही भेट दोन्ही गटाला ऑक्सिजन देण्यासाठी झाली असेल का ? किंवा तालुक्यातील नव्या राजकीय गणिताची आखणी तर झाली नाही ना! अशी चर्चा तालुक्यामध्ये होताना दिसत आहे.
येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक,जिल्हा परिषद, पंचायत समिती,मकाई सहकारी साखर कारखाना, यांच्या निवडणुका होणार असून या निवडणुकांची ही रणनीती तर नाही ना अशी चर्चा सध्या होत आहे, करमाळा तालुक्याचे आमदर संजयमामा शिंदे हे अपक्ष असले तरी ते सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून परिचित आहेत तालुका पातळीवर संजयमामा आणि जगताप यांची युती असून ते एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत, तर दुसरीकडे बागल यांनी शिवसेने कडून विधानसभा लढवली असल्याने ते शिवसेनेचेच आहेत, तर मा.आमदार नारायण पाटील यांनी विधानसभा अपक्ष लढवली होती, मला पक्षाने तिकीट दिलं नसलं तरी मी शिवसेनेचा आमदार होतो आणि मी आजूनही शिवसेने सोबतच आहे असे ते ठामपणे सांगत आहेत, तालुक्यातील पाटील व बागल हे दोन मोठे गट एका पक्षाच्या विचारांचे असले तरी त्यांचे तोंड मात्र विरोधी आहेत, मात्र हे दोन्ही गट आपआपले राजकीय बस्तान बसवणेसाठी झगडत आहेत, हे नक्कीच! जगताप यांचे महत्वाचे सत्तास्थान असणारी बाजार समिती ही बागल आणि पाटील यांच्या हातात आहे, राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो, किंवा शत्रूही नसतो, हे सर्वश्रुत आहे त्याच पार्श्वभूमीवर पुढील राजकीय अखाडे आखण्यासाठी या भेटी तर नाहीत ना! अशी अटकळ तालुक्यातील काही जाणकार बांधत आहेत, विधानसभेला जगताप व शिंदे या गटाच्या एकीचा व ताकदीचा फायदा संजय मामा यांना आमदार करण्यात झाला असला तरी यापुढील निवडणुका व सत्ता बागल व पाटील यांच्याच् हातात राहाव्यात म्हणून हा सर्व खटाटोप आसूं शकतो, सध्याच्या गाठीभेटीवरून तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे, मात्र बागल व पाटील गटाची युती होऊन भविष्यात राजकारण एकमुखी होणार की सत्ता मिळवण्यासाठीच होणार हे येणारा काळच ठरवणार आहे


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.