सोलापूर // प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून बँन्ड पथक व सार्वजनिक उत्साववर बंदी असल्याने बँन्ड पथकांचे कलाकार आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची उपासमार होत आहे . म्हणून बँन्ड पथक कलाकार आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना आर्थिक मदत द्यावे . अशा मागणीचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखालील कलाकारांच्या शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात आपली महाराष्ट्र हे कलागुणांना प्रोत्साहन देणारे राज्य आहे. शिवाजी महाराजांनीही विविध कलाकारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक युगापासुन कलाकार राजे - महाराजे यांना आपले कलागुण दाखवून बक्षीस मिळविलेले आहे . आणि त्या बक्षीसावर आपले उदरनिर्वाह केल्याचे अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहे . त्याच पध्दतीने सध्याच्या नव्यायुगातही १२ भलुतेदारांपैकी बँन्ड कला पथक हेही एक देखील बलुतेदार मध्ये मोडला जातो . बॅन्ड पथकामध्ये ढोल वाजविणे , क्यानेर , ट्राम्पे , उपोनियम , सेक्स फोन , ढोल , ताशा , पियानो , नाशिक ढोल , इम , खंजरी , मोठा ढोल , अलगी आणि अनेक असंख्य वाद्य वाजविणारे कलाकार आहेत . या कलाकारांना सिजन प्रमाणे कामे मिळतात . म्हणजे वर्षातुन ३ ते ४ महिने काम मिळतो बाकीच्या वेळेला छोटे - मोठे मिळेल काम करुन कुटुंब चालवितात असा बँन्ड पथक कलाकारांचा उदनिर्वाह आहे . आणि इतर कलाकारांचा मात्र जीवनच जगणे मुश्किल झाले आहे . या इतर कलाकारांमध्ये वाघ्या मुरली , नाट्य कलाकार , बहुरुपी , गायक , पथ नाट्य , लोकनाट्य , तमाशा हे व इतर अनेक कलागुणांत काम करणारे कलाकार हे मिळेल त्या वेळेला कला सादर करुन उपजिविका करतात . अशा या बँन्ड कला पथक व कलाकारांच्या जिवनमान असून या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा त्यांना आधार नाही .
२० मार्च २०२० पासून आज पर्यंत महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे . सदर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी अंतरा - अंतराने लॉक डॉउन जाहीर केलेले आहे . आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून वाद्य वाजविणारे व कला सादर करणारे सर्व कार्यक्रमावर बंदी आणली आहे . सदर बंदीमुळे अक्षरशः बँन्ड पथक कलाकार व इतर कलाकारांचा रोजीरोटीच बंद पडलेली आहे . त्यामुळे सदर कलाकार व त्यांच्या
कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन अनेक कलाकार आत्महत्या केले आहेत . संपूर्ण वर्षभरामध्ये हीच परिस्थिती असल्या कारणाने कलाकारांसह त्यांच्या कुटुंबिय देशाघडीला लागले आहेत . अशा परिस्थितीत शासन म्हणून त्यांना आदर देणे गरजेचे आहे . म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने कलाकारांना प्रत्येक कुटुंबियांना १०,००० / - ( दहा हजार रुपये ) मदत करावी . व प्रत्येक कुटुंबाला ३ महिन्याचे धान्य मोफत द्यावे . अशी आग्रहाची मागणी करीत आहोत .
तरी माननीयांनी वरील निवेदनाचा सहानुभुती व गांभीर्याने विचार करुन बँन्ड पथक कलाकार व इतर कलाकारांना आर्थिक सहाय व धान्य देऊन आधार द्यावा . ही नम्र विनंती . असे नमूद करण्यात आले आहे .
सदर निवेदनाचे प्रत मा . मुख्यमंत्री , मा . उपमुख्यमंत्री , मा . कामगार मंत्री , मा . कामगार राज्य मंत्री , मा . सांस्कृतिक कार्यमंत्री , यांना पाठविण्यात आले आहे . विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात गणेश मोरे , सदाशिव सुरवसे , प्रभाकर कदम , नारायण दणाणे , कशाल सुरवसे , कैलास गायकवाड , संजय दणाणे , लहु मोरे , भारत देवकुळे , वसंत काळे व कलाकार उपस्थित होते .


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.