उद्योगपती अशोक जैन यांचेही मोलाचे सहकार्य!
सोलापूर // प्रतिनिधी
कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यवस्था ठप्प झालेली असताना, सोलापुरातील लोककलावंतांची उपासमार होत आहे.रोजचा उदरनिर्वाह स्वतःच्या कलेवर अवलंबूनअसल्यामुळे बहुरूपी,शाहीर,पोतराज,आदि लोककलावंत आर्थिक संकटात आहेत . हे कलावंत ज्यांनी महाराष्ट्रातील लोककला जतन केली आहे, संवर्धन केलीआहे,दुर्लक्षित व लुप्त होत चाललेल्या लोककला ज्यांनी जिवंत ठेवल्या आहेत ते कलावंत सध्या उपासमारीला सामोरे जात आहेत. या कलावंतांची संपूर्ण उपजीविका या लोककलांवर अवलंबून असल्यामुळे सध्याच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी नगरसेवक, मनोज प्रकाश यलगुलवार व उद्योगपती अशोक जैन यांनी या गरजू लोककलावंतांना एक छोटीशी मदत म्हणून आर्थिक सहाय्य केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश वाले यांनी मनोज यलगुलवार यांनी करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.तसेच हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतो,ते नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांचेही आभार मानले, व लोककलावंतांना आपल्या भाषणातून नाट्य परिषद शाखा सोलापूर व काँग्रेस पक्ष पाठीशी आहोत असा दिलासाही दिला. तर मनोज प्रकाश यलगुलवार यांनी "आपण या क्षेत्रातील कलावंतांच्या अडचणी जवळून पाहात असल्यामुळे या क्षेत्रातील गरजू कलावंतांसाठी खारीचा वाटा म्हणून मदत केली पाहिजे, या भावनेतून ही मदत करीत आहोत." अशा,भावना यावेळी व्यक्त केल्या.
याप्रसंगी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले,कार्याध्यक्ष मनोज प्रकाश यलगुलवार, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरचे प्रमुख कार्यवाह प्रा.जोतिबा काटे, लक्ष्मीनारायण रंगम तसेच लोककलावंत यल्लप्पा तेली - बहुरूपी, गोविंदप्पा सितारे-बहुरूपी, महादेव सितारे- बहुरुपी, कृष्णा विभुते-बहुरूपी, सुभद्राबाई सूर्यवंशी - बहुरूपी, जैनुद्दीन हिमोने -शाहीर, नारायण शिंदे - शाहीर, हुच्चप्पा उघडे -पोतराज, बिस्मिल्ला बिराजदार -लोक कलावंत, मारुती जयराम तेली -बहुरूपी, जम्मक्का तेली -बहुरूपी, यल्लम्मा तेली -बहुरूपी, मल्लंमा तेली -बहुरूपी, बाळासाहेब बेगमपूरे - शाहीर, बाळासाहेब काळे - शाहीर, गुरप्पा कोळी - लोककलावंत, मारुती सितारे - बहुरूपी, बाबू सितारे - बहुरूपी, राजू तेली -बहुरूपी आदी मंडळी उपस्थित होती.
शेवटी सोलापुरातील या लोककलावंतांच्या वतीने शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था- सोलापूरचे अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरचे प्रमुख कार्यवाह प्रा.जोतिबा काटे यांनी केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.