नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला जिल्ह्यातून हळहळ व्यक्त




अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. कोल्हार कोल्हूबाई(ता.पाथर्डी) हे त्यांचे गाव आहे.

 

मुंबईत अनेक वर्षे ते ट्रकचालक होते. गावी आल्यानंतर त्यांनी मित्रांच्या मदतीने शिवसेनेची शाखा सुरू केली. मिरीकरंजी जिल्हा परिषद गटाचे ते सलग पंधरा वर्षे सदस्य होते. शिवसेनेचे तालुका प्रमुखपदाचीही जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे पेलली.

 

पाथर्डी तालुक्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख होती.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात परिचित होते. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करुन जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget