यंत्रमाग, विडी, बांधकाम, असंघटीत कामगारांना 50 टक्के कामगारांच्या हजेरीवर काम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच शासनाने जाहीर केलेले रेशन धान्य व कामगारांचे अनुदान तातडीने देण्यात यावे




सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांची मागणी


सोलापूर // प्रतिनिधी 

यंत्रमाग, विडी, बांधकाम, असंघटीत कामगारांना 50 टक्के कामगारांच्या हजेरीवर काम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच शासनाने जाहीर केलेले रेशन धान्य व कामगारांचे अनुदान तातडीने देण्यात यावे अशी मागणी सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हे निवेदन ईमेल द्वारे पाठविले आहे.

या निवेदनाद्वारे शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी अशी मागणी केली आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन केल्यामुळे कामगार बहुल असलेल्या सोलापुरात विडी, यंत्रमाग, बांधकाम, असंघटीत कामगारासह सर्वांचे रोजगार बंद आहेत. यामुळे कामगारांची रोजी रोटी बुडत आहे. गेल्या दीड वर्षांपाऊन सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात असून कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात एक महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात आहेत. कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेकांनी मदत केली कसे तरी दिवस निघाले पण कोरोना दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनमुळे सर्वांचे रोजगार बंद असल्यामुळे लोकांना जगणे मुश्किल झाले आहे. सोलापूर शहरात एक महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये गेला आठवडाभर कडक लॉकडाऊन करण्यात आले होते त्याचे अपेक्षित परिणाम होऊन रुग्णसंख्या कमी होत आहे. दिनांक 15 मे नंतर कडक लॉकडाऊन संपणार आहे पण शासनाकडून अत्यावश्यक सेवा सोडून लॉकडाऊन वाढविणार असल्याचे कळते आहे तरी सोलापूर शहरातील विडी, यंत्रमाग, बांधकाम कामगार, असंघटीत कामगार या सर्व हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गाचा विचार करून त्यांच्या रोजी रोटीचे अडचण होऊ नये, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून योग्य खबरदारी घेऊन 50 टक्के कर्मचारी उपस्थिती राहून, योग्य नियोजन करून काम करण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच शासनाने जाहीर केलेले रेशनधान्य व कामगारांचे अनुदान तातडीने देण्यात यावे.

तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सकारात्मक विचार करून कामगारांना काम सुरू करण्यात तातडीने निर्णय घेण्यात यावा ही अशी मागणी करण्यात आली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget