रोज अडीच हजार नागरिकांना मोफत जेवण देण्यात येत आहे.
सोलापूर // प्रतिनिधी
आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे सोलापुरातील अनेकांचे रोजगार बंद आहेत. सोलापूर शहरात बहुसंख्य कामगार वर्ग असुन त्यांच्यावर लॉकडाउन मुळे रोजगार बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
शासन आपल्या परिने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रणिती शिंदे यांनी सामाजिक बांधलकी म्हणून महिला काँग्रेस आणि प्रियदर्शिनी सेल च्या माध्यमातून संकटात असलेल्या आपल्या सोलापूर शहरातील गोरगरीब बांधवासाठी "मदतीचा एक घास" मोफत जेवण वाटप उपक्रम सोलापूर शहरात चालू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील श्री जांबमुनी चौक लष्कर, सुनील नगर, रामवाड़ी, मौलाली चौक, मल्लिकार्जुन नगर सुत मिल, 70 फुट रोड कुमठा नाका, साईबाबा चौक, सिव्हिल हॉस्पिटल, मोदी चौक, स्लाटर हाउस, रेवसिद्धेश्वर नगर, जगजीवनराम झोपड़पट्टी, आम्रपाली चौक, इरण्णा वस्ती, शास्त्री नगर, वडार गल्ली बुधवार पेठ, जूना विडी घरकुल, नीलम नगर या विविध ठिकाणी व अनेकांना घरपोच असे जवळपास 2500 हजार लोकांना रोज मोफत जेवण वाटप करण्यात येत आहे.
या उपक्रमात अनेकांचा हातभार लागत असुन अनेक जन स्वयंस्फुर्तीने यात चपाती, भाजी, अन्न, व अन्नधान्य अश्या प्रकारे मदत करत आहेत. प्रणितीताई शिंदे आम्हां गोरगरीबांसाठी एवढं करतात आपण ही यात ख़ारीचा वाटा उचलावा म्हणुन आज कुचन नगर येथील 90 वर्षाच्या श्रीमती रुक्मिणीबाई गरदास या आज्जीने स्वताच्या हाताने चारु बुव्वा (भात आणि आमटी) बनवून देऊन "मदतीचा एक घास" या उपक्रमात सहभाग नोंदवून सहकार्य केले. आणि मदत करण्यासाठी वय आणि परिस्थिती महत्वाची नसते मदत करण्याची भावना असावी लागते हे दाखवून दिले. त्यांच्या या जिद्दीला आणि धड़पडीला आमदार प्रणिती शिंदे यांनी सलाम केला आहे.
तसेच आ. प्रणितीताई शिंदे यांच्या मदतीचा एक घास हा उपक्रमाला प्रत्येक जण माणुसकीच्या नात्याने आपला एक घास देऊन मदत करत आहेत... समाजाचा आपण सुद्धा एक घटक आहोत असा संदेश देत सोलापूर च्या *पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे घाडगे* यांनी स्वता केलेले चपाती भाजी देऊन या अन्नदान सेवाकार्यात आपला सहभाग नोंदवला. माणूस कितीही मोठया पदावर पोचला तरी आपल्यातील साधेपणा आणि गोरगरीबांना मदत करण्याची भावनेचा विसर आपण पडू दिला नाही.
मॅडम आपण आपले कर्तव्य आणि या मदतकार्याद्वारे सामाजिक बांधिलकीचे संदेश दिले आहे.
तुम्हाला मनापासून सलाम


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.