आ संजय गायकवाड यांनी धार्मिक भावना दुखऊन किर्तनकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तहसील व पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल





(शिवसेनेच्या एकही आमदारांनी कुठेही आ संजय गायकवाड यांच्या बाजूने प्रतिक्रिया न दिल्याबद्दल महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायच्या वतीने शिवसेनेचे जाहीर आभार)

(बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले संजय गायकवाड यांनी महाराज मंडळीला फोन वर शिवागाळ करने योग्य नाही वारकऱ्यांची माफी मागावी या करीत आ संजय गायकवाड यांना सांगितले असी माहिती दिली )


बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी वृत्तपत्रांमध्ये हिंदू धर्मियांना आव्हान केले होते की आपण उपास ,तपास करू नका आणि आता तुमच्या कामात देवही येणार नाही कारण की देवाने आपला दरवाजा बंद केलेला आहे .म्हणून मासाहार करा जर आपण मासाहार केला तर कोरोणा पॉझिटिव्ह चे प्रमाण कमी राहील कारण की मुस्लिम समाजामध्ये मासाहार जास्त प्रमाणात केला जातो म्हणून मुस्लिम समाजामध्ये कोरोना पॉझिटिव पेशंट कमी आहेत. पण हे विधान करीत असताना आमदार साहेबांनी कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला दिलेला नाही आणि दि 13 मे तारखेला tv9 न्यूज चैनल वर एक बातमी आलेली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे मांसाहार करणाऱ्या मंडळी मध्ये कोरोना पॉझिटिव्ह चे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून संजय गायकवाड यांच्या विधानामुळे सनातन हिंदू धर्मामध्ये उपवास करणारी मंडळी मासाहाराकडे वळवण्याच्या प्रयत्नाने वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. पण संजय गायकवाड यांनी असे विधान का केले हे  कोणत्या वैद्यकीय सल्लेच्या आधारे केले ही विचारणा करण्याकरिता महाराष्ट्रातून बऱ्याच महाराज मंडळींनी आमदार संजय गायकवाड यांना फोन लावला असता संजय गायकवाड यांनी उर्मटपणा ने बोलायला सुरुवात केली गजानन महाराज दहिकर, अच्युत महाराज बोराडे,प्रकाश महाराज पांडे आणि इतरही बऱ्याच महाराज मंडळींसोबत अतिशय खालच्या दर्जाची भाषा ,काही महाराज मंडळींना आई-बहिणीवर शिवीगाळ तर कोणाला धर्मा बद्दल बोलायला सुरुवात केली एवढंच नाही तर मी देवधर्म काही मानत नाही देवाचा चमत्कार असता तर कोरोना आलाच नसता असे विधान केले. आणि वारकऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागायची विनंती केली असता माझं काही चुकलं नाही मी माफी मागणार नाही असे विधान संजय गायकवाड यांनी केले . संजय गायकवाड यांच्या बाजूने आतापर्यंत शिवसेनेच्या एकाही आमदारांनी प्रतिक्रिया दिलेली नाही उलट काही आमदार तर सरळ बोलले आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांच्या सोबत असे बोलायला नको त्या सर्व शिवसेनेच्या आमदारांचे आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने जाहीर आभार मानतो.एवढेच नाही तर बुलढाणा जिल्ह्याचे खासदार माननीय श्री प्रतापराव जाधव साहेब यांना सदर प्रकार सांगितला तर खासदार साहेब बोलायला लागले आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांच्या सोबत असे बोलणे योग्य नाही महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे आणि सर्व राजकीय मंडळी आम्ही महाराष्ट्रातील संतांचा आदर करतो मी स्वतः आमदार संजय गायकवाड यांना सांगितले झालेल्या प्रकाराबद्दल संत मंडळीची माफी मागा त्यामध्ये आपला काहीही कमीपणा नाही पण शेवटी आता त्यांची मर्जी आहे असे वक्तव्य खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी केल्याबद्दल त्याचेही वारकऱ्यांच्या तर्फे जाहीर आभार मानतो. पण नाईलाजाने संजय गायकवाड हे कोणाचेही ऐकण्या करीता तयार नाहीत आणि वारंवार महाराज मंडळींना शिवीगाळ करणे धमक्या देणे चालू असल्यामुळे आम्ही अकोट तहसील कार्यालय ,अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि या तक्रारीची दखल प्रशासनाने त्वरित घेऊन संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे. सदर प्रकरणाची माहिती मेल द्वारे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यापर्यंत पोहोचली असून स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे वारकरी संप्रदायाचा आदर करणारे होते त्याच अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांना समज देऊन वारकऱ्यांची जाहीर माफी मागायला सांगतील अशी अपेक्षा आहे. वारकऱ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करण्यात येत आहे की वारकऱ्यांचा अपमान करणाऱ्या संजय गायकवाड यांना शिवसेना पक्षाच्यावतीने पुन्हा उमेदवारी देऊ नये ही नम्र विनंती. झालेल्या प्रकाराबद्दल राजकीय दबावापोटी जर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा त्वरित दाखल करण्यात आला नाही तर आम्ही न्यायालयामध्ये धाव घेऊन प्रायव्हेट केस दाखल करणार आहोत तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालावे ही विनंती करण्यात येत आहे. तहसीलदार साहेब , व पोलीस स्टेशन येथे यांना तक्रार दाखल करतेवेळी ह भ प  गणेश महाराज शेटे, अच्युत महाराज बोराडे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, प्रकाश महाराज पांडे, सोपान महाराज ऊकर्डे, श्रीधर महाराज तळोकर, विक्रम महाराज शेटे ही वारकरी मंडळी उपस्थित होती उद्यापासून महाराष्ट्रात इतरही वारकरी संघटना आपापल्या परीने तहसील कार्यालयामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget