विडी कारखाने त्वरित चालू करा. विडी मालकांना कामगार संघटनांचे साकडे





सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना संकट काळातील लॉकडाउनमध्ये दररोजचे हक्काची रोजगारी मिळविणारे ७० हजार कामगारांना रोजगार मिळण्याचे बंद झाल्याने भयावह आर्थिक दुरावस्था निर्माण झाली आहे . त्यामुळे विडी कारखाने त्वरीत चालू करा अशी मागणी विडी उद्योग मालक संघाचे सचिव श्री . सुनिल क्षत्रीय यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) , महाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पल्ली , नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळ्ळी , राष्ट्रीय विडी मजदूर संघ ( इंटक ) चे सचिव राहुल गुजर , सोलापूर शहर काँग्रेस विडी - यंत्रमाग कामगार सेलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी अशा या सोलापूर शहरातील पाच कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विडी उद्योग मालक संघाच्या सचिवांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली . यावेळी विडी मालक संघाचे प्रवक्ते श्री . बाळासाहेब जगदाळे हे उपस्थित होते. 
           
विडी कामगार आपपल्या घरी बसून विडी वळण्याचे काम करतात . त्यामुळे शासनाचे कोरोना लॉकडाउन मधील “वर्क फ्रॉम होम” मान्य केलेली संकल्पना येथे लागू होते . याशिवाय तयार झालेले विडी देण्यासाठी व नव्याने विडी तयार करण्यासाठी लागणारे विडी पान , तंबाखू घेण्यासाठी विडी उद्योजकांचे शहरातील प्रत्येक भागा - भागात केंद्र आहेत . विडी माप स्विकारण्याचे वेग - वेगळे वेळ ठरवून व एक दिवस ऐवजी दोन दिवस तयार विडी स्विकारण्याचे धोरण ठरल्यास एकत्रीत गर्दी निश्चितपणे टाळता येते . असे असतांना विडी कारखाने बंद ठेवून श्रमजिवी कामगाराबाबत प्रशासनाकडून दुजाभाव निर्माण केला जात आहे . विडी कामगार रोजगारी बंद झाल्याने विडी कामगार तीव्र आर्थिक संकटात आहेत . म्हणून विडी कारखाने त्वरीत चालू करा . अशी मागणी या विडी कामगार कृती समितीने या प्रसंगी केले . यावेळी दशरथ नंदाल , श्रीनिवास बोगा , प्रशांत जक्का , गणेश म्हंता आदि उपस्थित होते . 
सदर नवेदनाचे प्रत
मा . मुख्यमंत्री , मा . उपमुख्यमंत्री , मा . कामगार मंत्री , मा . कामगार राज्यमंत्री , मा . पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना पाठविण्यात आले आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget