जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष मा श्री बळीराम(काका)साठे साहेब व आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
माजी आमदार मा श्री राजनजी पाटील साहेब व राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष मा श्री बळीराम(काका)साठेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या पुढाकारातुन व स्थानिक विकास निधीतुन(कोव्हीड१९)८० नॉन ऑक्सिजन व २० ऑक्सिजन असे १०० बेड चे कोव्हीड केअर सेंटर कोरोना बाधित रुग्णासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी बुधवार(दि १९)रोजी सुरू करण्यात आले आहे. आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक सरपंच जितेंद्र बाबा साठे,सभापती रजनी भडकुंबे,उपसभापती जितेंद्र शीलवंत,गटविकास अधिकारी डॉ. जास्मीन शेख मॅडम,तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद,युवक अध्यक्ष बालाजी पवार,हरीभाऊ घाडगे,बापू साठे,सरपंच भाऊसाहेब लामकाने,वैद्यकीय अधिक्षक डॉ घोरपडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुलकर्णी,सरपंच पांडुरंग लंबे,उपसरपंच सुनिल पाटील,भुजंग लंबे,अजित पाटील,डॅा.बारसोळे सह आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.