सोलापूर // प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण भारतात नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा महाभयंकर आशा कोरोनाव्हायरस च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एका अत्यंत गोरगरीब व कष्टकरी रुग्णाला रोग्य विभागाने धक्का दिला असून या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका ग्रामीण रुग्णालयाने दिनांक त्या रुग्णाला पॉझिटिव्ह असा रिपोर्ट दिला असून त्यांनी परत दिनांक 19 मे 2021 रोजी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असा आला आहे एका दिवसाच्या फरकाने पॉझिटिव्ह त्यानंतर निगेटिव रिपोर्ट येण्यामुळे सदर रुग्ण हेमंत मारुती पवार यांनी पंढरपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पुन्हा आपली करण्याची चाचणी केली असता तो रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे पूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बाप्पू धोत्रे यांनी याबाबत आवाज उठविण्याचे ठरविले असून आगामी काळामध्ये अशा कोणत्याही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह आल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी दिलीप धोत्रे यांनी सर्व पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेला केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.