आळंदी हे वारकरी संप्रदायाचे आदराचे तीर्थस्थान असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत आळंदी मध्ये एका वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर संस्थाचालक ह.भ.प. शिवप्रसाद रामनाथ भोकनळ या नराधमाने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून वारकरी सांप्रदायाला कलंकित केले अशा निंदनीय कृत्याचा आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा निरपेक्ष कीर्तन सेवा समूहाचे मुख्य प्रवर्तक ह भ प नाना महाराज कापडणीस यांचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे
विश्वमाऊली ज्ञानोबाराय,जगद्गुरु तुकोबाराय आदिकरुन संतमांदियाळीने हा परमार्थ कशा प्रकारे वाढवला,किती कष्ट सहन केले,ह्या परमार्थाची पायाभरणी करण्यासाठी किती बलिदान दिले हे नव्याने सांगण्याची गरज नाही,सर्व पारमार्थिकांना ईतिहास माहिती आहे.काय स्वप्न बघितले असतील ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी व संतमांदीयाळीतील सर्व संतांनी.,हा तोच सांप्रदाय आहे की ज्या परमार्थातील-सांप्रदायातील संतांनी आपला काम ताब्यात ठेवून आलेल्या परस्त्रीला " जाई वो माते!" सांगितले.आणि ह्याच परमार्थात-सांप्रदायात शिवप्रसाद भोकनळ सारख्या नराधम, बोकडाच्या जातीच्या कामपिपासू लोकांनी पदार्पण करुन आपली स्वत:ची कामवासना पुर्ण करण्यासाठी कुठल्याही परिणामांचा विचार न करता वाणीने उच्चारता येणार नाहीत अशी नीच कृत्य केलीत.
ह्या घटनेचा " निरपेक्ष कीर्तन सेवा " समुहातर्फे जाहीर निषेध नोंदवतोच परंतू तमाम पारमार्थिकांना विनम्रपणे आवाहनही करतो की जर आपण आपल्या पाल्यांना आळंदीसारख्या तीर्थक्षेत्री कोणत्याही " वारकरी शिक्षण संस्थेत " प्रवेश देणार असाल तर आपण ज्या संस्थेत प्रवेश द्याल त्या संस्थेची गुणवत्ता,त्या संस्थेचा ईतिहास,त्या संस्थेतील शिक्षकांची गुणवत्ता,त्या संस्थेचे रजिष्ट्रेशन ह्या सर्व बाबींची सखोल चौकशी करा,आणि मगच आपल्या पाल्याला तिथे प्रवेश द्या अन्यथा आपल्या पाल्याला जर खरच सांप्रदायाचे पाईक बनवायचे असेल तर घरच्या घरी हरिपाठ शिकवा,गावात बालसंस्कार शिबिरे घेवून आपल्या पाल्यांबरोबरच गावातील ईतर विद्यार्थ्यांना सांप्रदायामध्ये सामावून घ्या परंतू भोकनळ सारख्या नालायक लोकांच्या संस्थेत आपल्या पाल्याला पाठवूच नका.
अजुनही ख-या पारमार्थिकांनी,निष्ठावंत वारक-यांनी जरुर विचार करावा की भोकनळसारख्या नीच प्रवृतीचे लोक उजळ माथ्याने परमार्थात फिरत आहेत त्यांचा बंदोबस्त वेळीच झाला पाहिजे ह्यासाठी काहितरी ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा एक दिवस असा उजाडेल की,"गळ्यात तुळशीमाळ घालायची आहे" असा उच्चार जरी कुणी केला तरी लोक त्याला सामाजाबाहेर काढायला कमी करणार नाहीत.
म्हणून पुनश्च एकदा सर्व पारमार्थिकांना जाहीर आवाहन करतो की सांप्रदायात लागलेल्या भोकनळसारख्या किडीचा जास्त प्रादुर्भाव न होवू देता ह्या किडीला आतापासूनच फवारनी करायला सुरुवात करा.भोकनळसारख्या अस्तनीतल्या सापाची वेळीच नांगी ठेचा नाहीतर येणा-या काळात लोकं परमार्थाकडे वळणार तर नाहीच नाही परंतू जो खरा पारमार्थिक आहे त्याचे जीवन असह्य केल्याशिवाय रहाणार नाहीत.आधिच वारकरी सांप्रदायावर.ह.भ.प.महाराज मंडळी वर लोक नकोते दुशन देतात .म्हणून सर्वानी सावध व्हावे. व अशा निच लोकांना वेळी च ठेचावे असे अहावान ह.भ.प.नाना महाराज कापडणीस यांनी केले आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.