फरारी आरोपीस तात्काळ बेड्या ठोकून केली पोलिसांनी धडाकेबाज कारवाई!




सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार दिनांक १६ मे २०२१ नाकाबंदी ड्युटी बजावत असताना अक्कलकोट मार्गाने निघालेल्या व्यक्तीस वळसंग टोल नाक्यावर थांबवून त्याची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होता व सोबत एक मुलगी होती ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांना सदर व्यक्तीचे ओळखपत्र वरून त्याचे नाव शाहरुख सिकंदर शेख असल्याचे कळाले. 

त्याचेकडे अधिक माहिती घेतली असता तो बोलताना चाचपडला व फिटर चे काम करत असल्याचे सांगितले. 

तात्काळ कर्तव्यदक्ष पणा दाखवून प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित व्यक्ती बाबत माहिती मिळवण्याकरिता पोलीस हवलदार इक्बाल शेख, महिला पोलीस शिपाई कविता बिराजदार, सी.सी.टी.एन.एस. विभाग यांचेकडून सी.सी.टी.एन.एस.

 (गुन्हे व गुन्हेगार जाल मागोवा यंत्रणा) 

सी.सी.टी.एन.एस.

(C.C.T.N.S. Crime and Criminal Tracking Network and System) 

व आय.सी.जे.एस. 

(आंतर परिचालन गुन्हेगारी न्याय प्रणाली) 

आय.सी.जे.एस. 

(I.C.J.S. Interoperable Criminal Justice System) 

या केंद्रीय गृह विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या शोध प्रणालीतून अधिक माहिती घेतली असता संबंधित व्यक्तीवर दिनांक १५ मे २०२१ रोजी गुरनं ३२९/२०२१ भा.द. वि ३६३ प्रमाणे शिरूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण केले बाबत गुन्हा दाखल असले बाबत माहिती मिळाली. 

सदर बाबत शिरूर पोलीस ठाणेस तात्काळ कळविण्यात आले त्यावरून शिरूर पोलीस ठाणे कडील अधिकारी अंमलदार यांनी रात्री उशिरा दोघांनाही त्यांच्या ताब्यात घेतले.

सदर संशयित व्यक्ती शहरुख सिकंदर शेख हा पुणे ग्रामीण पोलिसांना इतर गुन्ह्यातही हवा असलेला आरोपी होता. 

वळसंग पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यतत्परतेमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यात यश आले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget