शेवटच्या ३८व्या फेरीचा निकाल संथगतीने सुरू!




(निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष)


सोलापूर // प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीनंतर शेवटपर्यंत आघाडी घेतली. अद्याप एक फेरी बाकी असून 37 फेरीअखेर भाजपाचे समाधान आवताडे यांनी 6010 मतांनी आघाडी घेतली आहे. मात्र, 38 व्या फेरीची मतमोजणी संथगतीने सुरू असल्याने अधिकृत अंतिम निकाल थांबला आहे. त्यामुळे, उमेदवार समाधान आवताडे यांनी मतमोजणी केंद्रात धाव घेतली आह. 


भाजपा समर्थकांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा विजयी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, अद्याप अधिकृत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. शेवटची म्हणजेच 38 वी फेरी अजून बाकी आहे. मात्र, मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याने समाधान आवताडे केंद्रावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. भाजपानेही विजय निश्चित मानला असून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. मात्र, अद्यापही विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे, पंढरपूर मतमोजणी केंद्रावर संभ्रमावस्था दिसत आहे.  


समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेणं अवघड बनलं होतं. समाधान आवताडे यांनी 19 व्या फेरीपर्यंत म्हणजे पढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यानंतर, मंगळवेढा येथील मतमोजणीला सुरुवात होताच, त्यांच्या आघाडीच्या मतांमध्येही चांगली वाढ झाल्याचे सातत्याने दिसून आलं. अद्याप अधिकृत विजयाची घोषणा झाली नसली, तरी भाजपा नेते आणि समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget