पंढरपूर शहरात आ.प्रशांतराव परिचारक यांनी मारली बाजी; पंढरपुरात आवताडे आघाडीवर





सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत त्यामध्ये उद्योगपती समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यातील काही गावांमधून आघाडी घेतलेली दिसत आहे. यामध्ये मुख्यत्वे पंढरपूर शहरातील बऱ्याच बुथमधून कमळ फुलणार असून यामध्ये सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक त्याचप्रमाणे युरोपियनचे चेअरमन उमेश परिचारक यांचे योगदान दिसत असल्याचे आत्ता तरी चित्र स्पष्ट झाले आहे.

आता पुढे पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे मतदारसंख्या असलेले कासेगाव येथील भागाची मतमोजणी होणे शिल्लक असून यामध्ये कासेगांवातून  कोण आघाडी घेतो. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याच प्रमाणे 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील संपूर्ण मतमोजणी व्हायला संध्याकाळचा वेळ लागणार असून यामध्ये कोण बाजी मारणार हे येत्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. याप्रमाणे पंढरपूर शहरातील सर्व भूत मधून समाधान आवताडे यांना आघाडी मिळत चालले आहे. याचाच अर्थ असा की पंढरपूरच्या सुधा जनतेला एक प्रकारे बदल हवा आहे आमदार प्रशांतराव परिचारक उमेश परिचारक यांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळे पंढरपूर शहरातील बऱ्याच अंशी भूथ वर अवताडे यांना आघाडी मिळाल्याचे आत्ता तरी दिसत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget