सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिकेच्या मा. नगरसेविका व पांडुरंग परिवाराच्या विश्वासू सौ.अलका महादेव काकडे रा. पंढरपूर यांचे दुःखद निधन झाले असून त्या 62 वर्षाच्या होत्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चिफ अकौटंट श्री. रवींद्र काकडे व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पार्सल प्रतिनिधी श्री. राहुल काकडे आणि वाईच्या नगरसेविका सौ. रुपाली अमित वनारसे यांच्या त्या मातोश्री आहेत.
त्यांच्या निधनाने काकडे परिवारास जे दुःख झाले त्याबद्दल विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक, पांडुरंग परिवाराचे नेते श्री. उमेशराव परिचारक, पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, साहेब व्हाईस चेअरमन श्री.वसंतनाना देशमुख, ज्येष्ठ संचालक दिनकर भाऊ मोरे, पंढरपुरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, वाईच्या नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिंदे, ST महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ईश्वरलाल चेचाणी, उद्योगपती मोहन देशमुख, संचालक हरीशदादा गायकवाड, शिवाजी साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, सुरेश आगावणे, तानाजी वाघमोडे आणि कारखान्याचे सर्व संचालक, सर्व अधिकारी, युनियन पदाधिकारी, कर्मचारी यांनी फोन करून व प्रत्यक्ष भेटून काकडे परिवाराचे सांत्वन केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.