सांगोला: येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दिनांक १६ मे व २३ मे रोजी नॅक मूल्यांकन संदर्भात ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भानुदास कुचेकर प्राचार्य व डीन एमआयटी वर्ल्ड पिस विद्यापीठ कोथरूड पुणे हे ऑनलाईन उपस्थित होते. त्यांचे स्वागत महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी केले. संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या उपस्थितीत हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी डॉ. भानुदास कूचेकर यांनी नॅक मुल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयामध्ये आवश्यक लागणारे सर्व घटक व सोयीसुविधा याविषयीची सविस्तर माहिती उपस्थित प्राध्यापकांना दिली. नॅक मुल्यांकनासाठी आवश्यक सर्व घटकांची पॉईंट टू पॉइंट माहिती उपस्थितांना दिली. तसेच नॅक मुल्यांकन करण्यासाठी संस्था,प्राचार्य, प्राध्यापक, नॉन टीचींग स्टाफ, विद्यार्थी,पालक या सर्वांना सामावून घेऊन काम करणे आवश्यक असते. महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या समिती स्थापन करून डॉक्युमेंटरी फाईलींग करून ठेवणे गरजेचे आहे.यावेळी ते म्हणाले नॅक मुल्यांकन करण्यासाठी ६५% हे काम ऑनलाईन डेटा भरून करावयाचे आहे, तर ३५ % हे काम ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहे.तसेच त्यांनी कोणत्या घटकाला किती वेटेज आहे याची सविस्तर माहिती दिली. नॅक मुल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाने ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे करावे त्याकरिता पुर्व तयारी कशी करावी याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल पोरे व आभार प्रा. सर्फराज काझी यांनी केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.