सोलापूर // प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात जनतेला धीर देणारे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी व्हावे म्हणून सर्वच समाजातील धर्मगुरू प्रार्थना करत आहेत. त्यातील ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर यांना माजी आमदार प्रकाश यलगुलवार व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या हस्ते कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष बाबूराव म्हेत्रे कॉंग्रेस अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष मोनिका सरकार, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नधान्य साहित्य किट भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी पास्टर संजीव मोरे, पास्टर जॉन शिंदे, पास्टर डेवीड बनसोडे, पास्टर सुनील गायकवाड, पास्टर शांतराज जंगम, पास्टर जॉन दिनकर, पास्टर येशु मड्री, पास्टर डॅनियल जाधव, दाविद कंदेपल्ली, संजय गौत्रे, डेव्हिड मंचले, जॉन शिंदे, शमुवेल बुधुर, इनानुएल भंडारे, प्रकाश जंगम, दयानंद अडसुळे आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.