दिल्लीहून गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये सापडले नोटांचे बंडल रक्कम मोजता मोजता अधिकारी हैरान





दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात मोठ्या प्रमाणात नोटा सापडले आहेत. दरम्यान अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली होती सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती. नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या होत्या की नोटा मोजता मोजता अधिकारी यांना संध्याकाळ झाली. त्यामुळे पोलीस आणि इतर अधिकारीही चक्रावून गेले. कारमध्ये प्रचंड प्रमाणात नोटा सापडल्याने सर्वच जण अवाक झाले. ही रक्कम किती असेल याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. शिवाय हाताने नोटा मोजणंही त्यांना शक्य नव्हते. तसेच पोलीस ठाण्यात नोट मोजण्याची मशीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे बँकांमधून नोट मोजण्याची मशीन मागवण्यात आली. सकाळपासून मशीनने या नोटा मोजण्यास सुरवात झाली दरम्यान नोटा मोजता मोजता संध्याकाळ झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही भलतीच दमछाक झाली. ही संपूर्ण रक्कम 4.5 कोटी असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. DL8C AX3573 या क्रमांकाच्या गाडीत या नोटा सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तसेच हा सर्व पैसा हवाल्याचा असल्याचाही प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान नॅशनल हायवे रस्ता क्रमांक 8 वर एक कार अडवली. या कारची तपासणी केली असता त्यात नोटांचं घबाड आढळून आले. एक दोन लाख नव्हे तर तब्बल 4.5 कोटी रुपये या कारमधून जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे दरम्यान राजस्थान पोलीस कडून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. हा पैसा हवाला मार्गे आला असावा, असं डीएसपी मनोज सवारियां यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget