शिक्षकांच्या विमा कवच साठी केली ५० लाखाची केली पत्राद्वारे मागणी
पंढरपूर // प्रतिनिधी
राज्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले असून त्यासाठी महाराष्ट्रा मध्ये मागील दीड वर्षा पासून आपत्ती व्यावस्थापक कायद्याच्या कक्षेत राज्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांस शिक्षक व शिक्षिका यांना शिक्षण विभागाने गाव पातळीवर कोविड सर्वेक्षण,चेक पोस्ट,कोविड सेंटर,लसीकरण,रेशन दुकान इत्यादी विविध ठिकाणी नियुक्त्या केलेल्या आहेत हे शिक्षक कर्त्यव्य बजावत असताना अनेक ठिकाणी कोरोना पोजिटिव्ह होऊन अनेकांचे दुर्दैवाने निधन झाले आहे. परंतु राज्य सरकारने या शिक्षकाचा विमा कवच ५० लाख रुपये दिलेले नाहीत तसेच शासनाच्या परिपत्रकामध्ये शिक्षकांचा नामोल्लेख नसल्याने हा शिक्षक घटकावर अन्याय होत आहे.
तसेच फ्रंट लाईन कोरोना वारीयर्स उदा.डॉक्टर्स,पोलीस,नर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,शिक्षक, आरोग्य कर्मचारी ज्यांच्या सेवा शासनाने अथवा स्थानिक प्रशासनाने अग्रहित केल्या आहेत.अशा सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विविध उपचारासाठी स्वतंत्र कोविड सेंटर मध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी. सदरच्या सुविधा नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून सर्व शिक्षक कर्मचारी आपल्या आदेशाचे पालन करून प्रामाणिकपणे कर्त्यव्य पार पाडीत आहेत परंतु शिक्षक घटकावर दुजाभाव होत आहे तरी राज्यातील शिक्षकांना ५० लाख विमा कवच लाभ जाहीर करावा तसेच सर्व वारीयर्स व त्यांचे कुटुंबियांना उपचासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणेचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देणेत यावे अशी मागणी दिलेल्या पत्राद्वारे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केलेली आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.