मागील ४५ दिवसापासून विडी कारखाने बंद असल्याने ६० ते ७० हजार कामगारांची अक्षरशः उपासमार होत आहे . विडी कामगार आपपल्या घरात बसून विडी वळण्याचे काम करतात. “वर्क फ्रॉम होम" ही संकल्पना कोरोना लॉकडाउनमध्ये अंमलात येत आहे . विडी कामगारांचे रोजगारीबाबत अन्याय होत आहे . आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्यासारखे घटना होण्याची शक्यता असल्याने आजचे आज विडी कारखाने सुरू करण्याचे आदेश द्या अशी मागणी सोलापूर विडी कामगार संघटना कृती समितीच्या शिष्ठमंडळांनी पालकमंत्री ना . दत्तात्रय ( मामा ) भरणे यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली . या शिष्ठमंडळात महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) , महाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पल्ली , नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळ्ळी , राष्ट्रीय विडी मजदूर संघ ( इंटक ) चे सचिव राहुल गुजर , सोलापूर शहर काँग्रेस विडी - यंत्रमाग कामगार सेलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी या पाच कामगार संघटनाचा समावेश होता .
हक्काची रोजी - रोटी गमावून बसलेल्या ६० ते ७० हजार विडी कामगारांना जगण्याचे साधनच गमवावे लागत आहे . त्यांना व त्यांच्या कुटुंबातील लहान थोर व्यक्तींना दैनंदिन खर्च व आरोग्य सुविधापासून वंचित राहावे लागत आहे . ही आर्थिक भिषणता लवकर संपवून त्यांना त्यांच्या हक्काची रोजी - रोटी देण्यासाठी विडी कारखाने आजचे आज सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत . अशी मागणी यावेळी करण्यात आली . विडी वळण्याचे काम घरात बसून केले जाते . तयार झालेले विडी स्विकारणे व पुन्हा नव्याने विडी तयार करण्यासाठी कच्चा माल घेण्यासाठी विडी कारखानादारांचे सेंटर्स यापूर्वीच शहरातील विविध भागात विडी कामगारांना जवळपास होतील असे आहेत . दोन दिवसआड दिवस विडी माप घेण्याची पध्दत यापुढेही कायम ठेवून दिवसभर ठराविक वेळा ठरवून दिल्यास कुठेही गर्दी होण्याची शक्यता नाही . याबाबत विचार होऊन विडी कारखाने चालू करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली .
पालकमंत्री यांना भेटताना सोलापूर विडी कामगार संघटना कृती समितीचे पदाधिकारीसह प्रशांत जक्का , दशरथ नंदाल , गुरूनाथ कोळी , गणेश म्हंता , श्रीनिवास बोगा हे उपस्थित होते .विडी कामगार कामगार संघटना कृती समितीनी यापूर्वी आंदोलनाद्वारे जिल्हाधिकारी , सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी . शिवशंकर , महापौर सौ . श्रीकांचना यन्नम , सहा . कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे , विडी मालक संघाचे सचिव श्री . सुनिल क्षेत्रिय , प्रवक्ते श्री . बाळासाहेब जगदाळे यांची समक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदनद्वारे विडी कारखाने त्वरीत चालू करा . अशी मागणी केली आहे . विडी कारखाने प्रत्यक्षात चालू होईल धरणे आंदोलन यापूढेही करण्यात येईल असे याप्रसंगी संघर्ष समितीने जाहीर केले .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.