सोलापूर // प्रतिनिधी
मार्च २०२० पासून कोरोना महामारी तांडव घालित आहे . यात पहिल्या व दुसऱ्या टप्यात नागरिकांचे झालेले हाल व नुकसान आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले आहोत . आता येणारे संभाव्य कोरोना तिसरी लाट ये महाभयानक असून याचा सार्वधिक धोका लहान मुलांवर होतो असे दिसून येते . म्हणून सोलापूरातील नागरिक बंधु - भगिनींनो कोरोना तिसऱ्या लाटाबाबत निष्काळजी करून नका . कोरोनाचे सर्व नियम पाळा कोरोना तिसरी लाट पळवा आणि भविष्य वाचवा असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस व कोविड - १९ सेवा केंद्राचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी केले आहे.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात कोविड - १९ सेवा केंद्राचे उद्घाटन विडी कामगार महिला मिनाक्षी सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले . तर कार्यक्रमाचे अध्यक्षतेस्थानी विष्णु कारमपुरी (महाराज) हे होते . प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुजन करून , सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी उपस्थित सर्व स्वयमसेवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की , ज्या कोरोनाने लहान मुलांच्या रुपात असलेल्या भविष्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न करतो अशा कोरोनाला आपण हद्दपार करु या . असा निर्धार करून सर्व स्वयमसेवकांनी तन - मन - धनाने सेवा करा . असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल , सचिव विठ्ठल कुऱ्हाडकर , समिती उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी , एस.बी. न्युज चॅनलचे उपसंपादक :- श्रीनिवास बोगा , अबतक संपादक :- प्रसाद जगताप , प्रशांत जक्का , साप्ताहिक गुरूरथमचे संपादक :- गुरूनाथ कोळी , दैनिक अबतक चे वार्ताहार संतोष जाधव , दैनिक सोलापूर भुषणचे संजीव शेट्टी , अनिता बटगिरी , सविता मेरगु , कामगार सेना कार्यालय प्रमुख पप्पु शेख , पत्रकार कादरी शेख , गणेश म्हंता आदि उपस्थित होते .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.