सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने माजी आमदार प्रकाश यलगुलवार, व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज यलगुलवार यांच्या निवासस्थानी लॉकडाऊन मुळे अडचणीत असलेल्या गरजु दिव्यांग बांधवांना अन्नधान्य साहित्य किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रकाश गायकवाड, संतोष गायकवाड, नागनाथ कटकम, इस्माईल अहमद, शेखर सोनवणे, संतोष लवटे, सचिन चपेकर, श्रीनिवास तुम्मा, उमाशंकर माळी, सिद्धाराम बेळमगी यांच्यासह इतर उपस्थित होते.
तसेच माजी महापौर आरिफ शेख यांच्या माध्यमातुन आळंदकर चाळ येथे ही गरजु कुटुंबांना अन्नधान्य साहित्य किट व मास्क वाटप करण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.