विडी कारखाने सुरू करा. २३ नगरसेवकांचे पालकमंत्रीकडे मागणी




सोलापूर // प्रतिनिधी 

विडी उद्योगातून ६० ते ७० हजार विडी कामगारांना रोजगार मिळते . कोरोना लॉकडाउनमध्ये मागील ४५ दिवसांपासून विडी उद्योग बंद असल्याने विडी कामगार हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत . म्हणून विडी कारखाने त्वरीत चालु करण्यात यावेत अशी मागणी सोलापूर शहरातील २३ नगरसेवकांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे , जिल्हाधिकारी श्री . मिलिंद शंभरकर व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री . पी . शिवशंकर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे . यामध्ये माजी उपमहापौर सौ . शशिकला बेत्तुल , भाजप पक्षनेते श्रीनिवास करली , नगगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर , नगरसेवक तौफिक शेख , नगरसेविका सौ . प्रिया माने , नगरसेविका सौ . मनिषा हुच्चे , नगरसेविका सौ . कुमुद अंकाराम , नगरसेविका सौ . अंबिका पाटील , नगरसेविका सौ . वंदना गायकवाड , नगरसेविका सौ . रामेश्वरी बिरु , नगरसेविका सौ . वरलक्ष्मी पुरुड , नगरसेवक राजकुमार हंचाटे , नगरसेवक विनायक कोंड्याल , नगरसेवक सुभाष शेजवाळ , नगरसेवक प्रविण निकाळजे , नगरसेविका सौ . अनुराधा काटकर , नगरसेविका परवीन इनामदार , नगरसेविका तस्लिम शेख , नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले , नगरसेवक शिवानंद पाटील , नगरसेविका सौ . निर्मला तांबे , नगरसेविका सौ . अनिता कोंडी , नगरसेविका सौ . राजश्री कणके यांचा समावेश आहे . 

               सोलापूर विडी कामगार कृती समितीने विडी कारखाने सुरू करावे . यासाठी पालकमंत्री , जिल्हाधिकारी , महापौर , मनपा आयुक्त , सहा . कामगार आयुक्त , विडी मालक संघ अशा सर्व स्तरातील मान्यवरांना समक्ष भेटून पाठपुरावा कले आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget